Random Video

टेकेपार ग्रामस्थ पुरात अडकले NDRF दाखल | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 355 Dailymotion

वेलतूर (नागपूर) : कुही तालुक्यात आलेल्या पुराने टेकेपार गावातील सातशेहून अधिक ग्रामस्थ अडकले असुन गावाला रात्री पासुन पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. गावातील संपर्क तुटला असुन मुख्य मार्ग बंद पडला आहे . आपतकालीन व्यवस्थापन टिम दाखल झाली असुन युध्द स्थरावर बचाव कार्य सुरूअसल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. तोतलाडोह पेच व संजय सरोवर धरणाच्या पाण्यात विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आभोरा देवस्थान वेढल्या गेले असुन मंदिरात जानारा मुख्य मार्ग व पुलावर पाणी चढले आहे. चोवीस वर्षांपूर्वी ची ही स्थीती पुन्हा येथे निर्माण झाली आहे. सुमारे चालीस लोक मंदीर परीसरात अडकले असल्याची माहीती असुन मासेमारीचे साहीत्य मोठ्या प्रमाणात वाहुण गेले आहे. मंदीर परीसरात व्यवसाय करणारी ग्रामस्थ, पुजारी व मंदीर कर्मचारी तिथे अडकले आहेत. बचाव पथकाद्वारे त्यांना बाहेर काढण्याच्या हालचाली ना वेग आला असुन बचाव पथकाच्या दोन तुकड्या येथे डेरेदाखल झाल्या आहेत.(व्हीडीओ- शरद शहारे )
#Flood #Nagpur #Dam #Pench #River #NDRF #Rescue

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.